भाजपच्या राजश्री चव्हाण यांचे नगरसेवकपद स्थगित, तीन अपत्यांचे कारण, न्यायालयाचे निर्देश
सोलापूर- महापालिका निवडणुकीत प्रभाग २६ (अनुसूचित जमाती महिला अारक्षित) मधून विजयी झालेल्या भाजपच्या नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांच्या महापालिका सदस्यत्वास स्थगिती देण्याचा आदेश दिवाणी न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी गुरुवारी दिला. राजश्री चव्हाण यांना तीन अपत्ये असल्याने निवडणुकीस त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार उमा विजय पारसेकर यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात दाखल केली अाहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आदेश दिले.
उमा पारसेकर यांच्यातर्फे अॅड. व्ही. एस. आळंगे यांनी युक्तिवाद केला. चव्हाण यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात तीन अपत्ये असल्याचे कबूल केले आहे. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची छाननी करता घाईगडबडीने निष्काळजीपणे चव्हाण यांचे नामनिर्देशनपत्र मंजूर केले.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि राजश्री चव्हाण यांनी याप्रकरणी प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अॅड. आळंगे यांनी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरीत चव्हाण यांच्या निवडीला स्थगिती देण्यात
महापालिका कामकाजात भाग घेऊ नये :राजश्री चव्हाण यांनी नगरसेवक म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजात भाग घेऊ नये, सदर पदाचा कोणताही लाभ घेऊ नये, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या उमेदवार अॅड. उमा पारसेकर यांनी सोमपा आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
आजवर त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही, असे अॅड. आळंगे यांनी कळविले आहे. या प्रकरणात अर्जदारातर्फे आळंगे यांच्यासह अॅड. सविता बिराजदार, अॅड. अमोल गायकवाड, अॅड. अश्विनी इंदापुरे यांनी काम पाहिले.

अतिशय दुखद घटना... ;-(
ReplyDeleteईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना