गुड न्यूज : रिपोर्ट आले ‘निगेटिव्ह’ ; सोलापुरात एकही कोरोना रुग्ण नाही – जिल्हाधिकारी

संपूर्ण सोलापूर शहर आणि परिसरात खळबळ माजविणाऱ्या घटनेमुळे अनेकांनी भीती व्यक्त केली होती.
दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व्यक्तीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातून काही नागरिक या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते.

सोलापुरातील काही लोक दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. पोलीस प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या सर्व लोकांची यादी घेऊन शोधमोहीम सुरू केली. त्यामध्ये आढळून आलेल्या लोकांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ते 31 रिपोर्ट निगेटिव्ह…
सोलापुरातील शासकीय रुग्णालय मधून ज्या नागरिकांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.त्या 31 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली त्यांचा अहवाल येणं बाकी होतं. तो सद्यस्थितीत मिळाला आहे. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.यामध्ये दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या व्यक्तसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचा ही समावेश आहे.
मिलिंद शंभरकर , जिल्हाधिकारी

लॉकडाऊनचे सोलापूरकरांनी पालन करावे
होय, आत्ताच्या स्थितीत सोलापुरात आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही ही समाधानाची बातमी आहे.
मात्र लॉक डाऊनच्या आदेशाचं सोलापूरकरांनी पूर्णपणे पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केलं आहे.

हे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा सोलापूर वासियांना मिळाला आहे. सद्यस्थितीत सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही .मात्र घरी राहून सुरक्षित राहण्याचे प्रशासनाने केलेले आवाहन पालन करणं हे गरजेचे आहे.

Comments