सोलापुरातील बाजारपेठा हाऊसफुल्ल

सोलापूर शहरात कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील संचारबंदी सोमवारपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, खरेदीसाठी सोलापूरकरांना शुक्रवारी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत सवलत दिली होती. मात्र या सवलतीचा फायदा घेत सोलापूरकरांनी शहरातील सर्वच बाजारपेठ परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. याचवेळी प्रशासनाने सांगितलेले सर्व नियम धाब्यावर बसवून शहरवासीयांनी खरेदीसाठी गर्दी केली.





दरम्यान, गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजत असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

Comments