सोलापुरात वाढले आणखीन 103 रुग्ण ; एकूण संख्या 851

चिंता वाढली : तीन जणांचा कोरोनाने घेतला बळी ; 103 रुग्णांची भर

सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सायंकाळी 5 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 103 नव्या रूग्णांची भर पडली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 75 झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 851 वर पोहोचली आहे.
एकूण रुग्ण ८५१, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ३५१, मृत रुग्ण ७५ तर ४२५ रुग्णांवर उपचार सुरु


आज सायंकाळी 301 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 23 महिला व 80 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. मात्र आतापर्यंत 351 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर कारागृहातील ३४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

दिलेल्या माहितीनुसार  संध्याकाळी 103 पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 80 पुरुष तर 23 महिलांचा समावेश होतो. ही आकडेवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान देण्यात आली आहे

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 851 आहे तर आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 75 आहे. आज 1 पुरुष आणि महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 425 असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले व्यक्तींची संख्या 351 आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.






Comments