सोलापुरात कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव ; आज 43 कोरोना रुग्णांची भर,वाचा 'कुठे' वाढले रुग्ण

सोलापूरात आज नव्याने 43 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 43 रुग्णांमध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 43 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 667 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.


आज एकूण 270 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 43 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 227 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 5 हजार 493 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 66 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 311 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
एकूण रुग्ण ६६७, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ३११, मृत रुग्ण ६६ तर २९० रुग्णांवर उपचार सुरु

दक्षिण सदर बझार परिसरातील 60 वर्षीय महिला 18 मे रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 27 मे रोजी पहाटे एक वाजता या महिलेचे निधन झाले आहे. भवानी पेठेतील मराठा वस्ती येथील 75 वर्षीय पुरुषाला 26 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 26 मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. जुना विडी घरकुल परिसरातील महेश नगर येथील 64 वर्षीय पुरुषाला 25 मे रोजी दुपारी सव्वातीन च्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 27 मे रोजी पहाटे दोन वाजता त्यांचे निधन झाले.

आज नव्याने आढळलेल्या 43 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. अशोक चौकातील एक पुरुष व तीन महिला,  दत्तनगर पाछा पेठेतील एक पुरुष व तीन महिला, मिलिंद नगर बुधवार पेठेतील तीन पुरुष, प्रियदर्शनी सोसायटीमधील एक महिला, उत्तर कसबा येथील एक पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील एक पुरुष, सोलापूर जिल्हा कारागृह सोलापूर येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक पुरुष, अवंती नगर येथील एक पुरुष, कविता नगर पोलिस लाईन येथील एक पुरुष, नइ जिंदगी येथील एक महिला, जुना विडी घरकुल येथील एक पुरुष व तीन महिला, विडी घरकुल येथील चार पुरुष, भवानी पेठ मराठा वस्ती येथील एक पुरुष, पाछा पेठेतील एक पुरुष, माधव नगर येथील एक पुरुष, गीता नगर न्यू पाछा  पेठ येथील एक महिला,  शिव पार्वती नगर येथील एक पुरुष, न्यू बुधवार पेठेतील एक महिला, कुमार स्वामी नगर शेळगी येथील एक महिला, माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील दोन महिला, उपरी (ता. पंढरपूर) येथील एक महिला, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील एक महिला, पंढरपूर तालुक्यातील ज्ञानेश्वर नगर येथील एक पुरुष व एक महिला,  पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एक पुरुष,  अक्कलकोटमधील मधला मारुती येथील एक पुरुष, अक्कलकोटच्या भारत गल्ली येथील एक पुरुष अशा 43 जणांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या 32 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 538 अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.



सोलापूर शहर व जिल्ह्यातील 6 हजार 698 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Comments