सोलापुरात कोरोनाची दहशत सुरुच, रात्रीत वाढले तब्बल 74 रुग्ण

आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधितांची संख्या 74 ने  वाढली आहे. काल गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 81 रुग्णांची भर पडल्याने सोलापूरकरांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.


सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 74 नव्या रूग्णांची भर पडली असून आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 822 वर पोहोचली आहे.(solapur corona updated)  आज सकाळी 166 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 14 महिला व 60 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले.  मात्र आतापर्यंत 321 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने आज सकाळच्या सञात तरी मृत्यूची नोंद नाही.

आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने  शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.तसेच काही तालुक्यातील ग्रामीण भागातही वाढ होताना दिसत आहे.

सोलापूर आजचा अहवाल
दि.29/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह – 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321

Comments

  1. पंढरपूर तालुक्यातील संख्या आहे का काही

    ReplyDelete