अबब...सोलापुरात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे सर्वाधिक 29 रूग्ण

अबब...सोलापुरात एकाच दिवशी वाढले कोरोनाचे सर्वाधिक 29 रूग्ण


आज सोलापुरत नवे तब्बल 29 रुग्ण मिळाल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रदीप म्हैसकर  यांनी संगितले . आजवर घेतलेल्या 2775 टेस्ट पैकी  एकूण  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 182 झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 24 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर 148 जनावर उपचार सुरू आहेत.

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज  29    ने वाढून    182 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी दिली. आज पर्यंतचा सर्वाधिक वाढलेला हा आकडा आहे. आज एकाच दिवशी इतक्या बाधितांची संख्या वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

काल बुधवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 153 होती.अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. सोलापुरात आयसोलेशन वार्डात असणाऱ्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत   2775    जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली .यापैकी     2495 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात   2313  निगेटिव्ह ,तर     182 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,आज एका दिवसात सोलापुरात  126     चाचणी अहवाल आले यात अहवाल 97    निगेटिव्ह तर 29   पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये   14   पुरुष तर   15  स्त्री असून 1  स्त्रीचा मृत्यू झाला आहे.

आज आढळून आलेले नवे रुग्ण
आकाशवाणी केंद्र जवळ 12
अलकुंटे चौक 2
बापूजी नगर 4
भारतरत्न इंदीरा नगर 2
नई जिंदगी 4
रंगभवन 1
शनिवार पेठ 1
रेल्वे लाईन 1
न्यू पाच्छा पेठ 2

आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजतागायत 11 मृत्यू झाले आहेत.

आज जी महिला मृत पावली ती व्यक्ती न्यू.पाच्छा पेठ परिसरातील असून त्यांचे वय 48 आहे.दिनांक 6 मे रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये या महिलेस दाखल करण्यात आलं होतं. 6 मे रोजी दुपारी ती मृत पावली. आत्तापर्यंत मृतांची संख्या 11 झाली आहे. यात 5 पुरूष, 6 महिला असा समावेश आहे.