सोलापुरच्या महापौरसह आज 40 नवे रुग्ण,चौघांचा बळी

आज सोलापुरात 40 नवे बाधित रुग्ण मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिले आहे .यापैकी चार मृत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 469 इतकी आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे महापौर निवासस्थानी 1 पुरुष 1 महिला बाधित आढळून आले आहेत. एकूण रुग्ण १०८०, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४६९, मृत रुग्ण ९४ तर ५१७ रुग्णांवर उपचार सुरु. आज एकूण १५६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ११६ अहवाल निगेटिव्ह तर ४० अहवाल पॉझिटिव्ह तर आज चार जणांचे मृत्यू झाले असून अद्याप ७४७ अहवाल प्रलंबित आहेत.


सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता रात्री 7.30 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 40 नव्या रूग्णांची भर पडली असून आहे. तर चौघांचा मृत्यू झाला असून एकूण रूग्णसंख्याही 1080 वर पोहोचली आहे.

आज 156 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 4 महिला व 36 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले.  मात्र आतापर्यंत 447 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने  शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.तसेच काही तालुक्यातील ग्रामीण भागातही वाढ होताना दिसत आहे.

आज मृत पावलेले 4 जणांची माहिती - 
न्यू पाच्छा पेठ परिसर 68 वर्षीय पुरूष.
पाच्छा पेठ परिसरातील 60 वर्षीय महिला. पाच्छा परिसरातीलच 68 वर्षीय पुरूष.
तर पश्चिम मंगळवार पेठेतील 55 वर्षीय पुरूष.

आज जे रूग्ण मिळाले त्यात महापौर निवास 1 पुरूष, 1 महिला.
मरिआई चौक 1 पुरूष.
न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष.
एनजी मिल चाळ 1 महिला.
धाकटा राजवाडा कौंतम चौक 1 महिला.
जोडभावी पेठ 1 पुरूष.
 सोमवार पेठ 1 पुरूष.
 मराठावस्ती भवानी पेठ 1 महिला.
लक्ष्मीविष्णू हौ.सोसा. कुमठा नाका 1 पुरूष.
 कुमठा नाका 1 पुरूष.
 भैय्या चौक 1 पुरूष.
 मुकुंद नगर भवानी पेठ 1 पुरूष.
 जय मल्हार चौक बुधवार पेठ 1 पुरूष.
जेल सोलापूर 26 पुरूष.*



Comments