शनिवारी एकाच दिवशी 53 नवे बाधित तर 7 जणांचा मृत्यू

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार 290 अहवाल प्राप्त असून त्यापैकी 237 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 53 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 33 पुरुष आणि 20 महिलांचा समावेश होतो. विशेष म्हणजे शनिवारी एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेले बाधित रुग्णांची संख्या 74 इतकी समाधानकारक आहे .यामध्ये यामध्ये 29 पुरुष 45 महिलांचा समावेश होतो.


शनिवारी एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये चार पुरुष तर तीन महिलांचा समावेश होतो

शनिवारी रात्री बारापर्यंत आढळून आलेले बाधित

सोलापूर जेल – सहा पुरुष,
सिद्धेश्वर नगर एक पुरुष
आंबेडकर नगर एक महिला
बुधवार पेठ वडार गल्ली एक पुरुष
भवानीपेठ चार महिला तीन पुरुष
आदर्श नगर एक महिला
निर्मिती विहार एक महिला
विजापूर रोड एक पुरुष
इंदिरानगर एक पुरुष
इंदिरा वसाहत भवानी पेठ दोन महिला दोन पुरुष
नीलम नगर एक महिला दोन पुरुष
70 फूट रोड दोन महिला एक पुरुष
महेशनगर एक महिला
माधव नगर एक महिला
वारद फार्म एक पुरुष
न्यू सुनील नगर ,एमआयडीसी रोड एक पुरुष
शुक्रवार पेठ एक पुरुष
बी.सुनील नगर एक पुरुष
मड्डीवस्ती भवानी पेठ 1 पुरुष
विद्यानगर न्यू आरटीओ सोलापूर एक पुरुष
यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमठा नाका एक पुरुष शिवगंगा नगर कुमार हॉल एक महिला
रेल्वे लाईन एक पुरुष
भीमाशंकर नगर एक महिला
विजापूर नाका एक पुरुष
नई जिंदगी एक महिला, विद्या नगर शेळगी एक पुरुष
न्यू बुधवार पेठ एक महिला
केशवनगर एक महिला
उत्तर कसबा एक पुरुष
विजया लक्ष्मी चौक एमआयडीसी एक पुरुष
न्यू पाच्छा पेठ एक महिला
रेल्वे लाईन फॉरेस्ट एक पुरुष
बुधवार पेठ एक पुरुष
सम्राट चौक एक पुरुष

मयत झालेल्या व्यक्तींची माहिती
मयत झालेली व्यक्ती हनुमान नगर भवानी पेठ परिसरातील 71 वर्षाच्या महिला,
मार्कंडेय चौक, एमआयडीसी रोड परिसरातील 63 वर्षाचे पुरुष, विद्यावाडी भवानी पेठ परिसरातील 65 वर्षांचे पुरुष आणि बुधवार पेठ जय मल्हार चौक येथील 55 वर्षाची महिला यांचे निधन झाले आहे.
तसेच निलम नगर जवळील लोकमंगल हॉस्पिटल येथील 36 वर्षाचे पुरुष आणि कर्णिक नगर परिसरातील साठ वर्षाच्या महिला यांचाही मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

असे एकूण सात जणांचे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
आज पर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव आलेल्या बाजी त्यांची संख्या 1160 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 101 पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 418 आहे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 641 इतकी आहे.

Comments

  1. Solapur city and solapur gramin corona update should be given at a time. Separate update is confusing.😡😡😡😡

    ReplyDelete