आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नवीन 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिका क्षेत्र वगळून) आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नवीन 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.


आज दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 125 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 119 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दुपारी बारा वाजेपर्यंत आढळलेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अक्कलकोट शहरातील मधला मारुती गल्ली येथील दोन पुरुष, अक्कलकोट शहरातील उत्कर्ष नगर येथील एक महिला, अक्कलकोट शहरातील संजय नगर येथील एक पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगा येथील एक महिला आणि पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील एका पुरुषाचा समावेश आहे. अक्कलकोटमध्ये आढळले चार रुग्ण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिपरगा येथे आढळली कोरोना बाधित महिला ही नवी मुंबई येथून आलेली आहे. बार्डीमध्ये कोरोनाबाधित आढळलेला पुरुष हा पुण्यावरून आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण 42 जण कोरोना बाधित आहेत. त्यामध्ये 25 महिला 17 पुरुषांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील तीन पुरुष व दोन महिला अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रूग्णालयात सध्या 32 जण उपचार घेत आहेत. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या पाच असल्याची माहितीही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.

Comments