आज नव्याने 64 कोरोना रुग्ण ,मृत 5

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एकूण प्राप्त अहवाल 353 आहेत तर निगेटिव्ह अहवाल 289 आहेत पॉझिटिव्ह अहवाल 64 आले असून त्यामध्ये 43 पुरुष तर एकवीस महिलांचा समावेश होतो. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 99 इतकी झाली आहे.
एकूण रुग्ण ११४४, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४८४, मृत रुग्ण ९९ तर ५६१ रुग्णांवर उपचार सुरु


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सोलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण वाढले असून कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सायंकाळी 7.30 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 64 नव्या रूग्णांची भर पडली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 99 झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 1144 वर पोहोचली आहे.

आज सायंकाळी 353 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात  21 महिला व 9 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. एकूण रूग्णसंख्येमध्ये 495 पुरूष आणि 43 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 51 पुरूष व 32 महिला आहेत. मात्र आतापर्यंत 380 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.
रुग्ण आढळणे आणि बरे होण्याच्या प्रमाणात फार मोठी तफावत नसल्याने चिंता मोठी नसली तरी मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयात होणार्‍या कोरोना टेस्टच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाल्याने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. महापालिकेने देखील आता स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सोलापूरकरांमध्ये भीतीचे वातावरण वाढले असून कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी  8 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सकाळच्या सत्रातच 64 रुग्णांची भर पडली. तर मृत्यू झालेल्यांची संख्याही पाचने वाढली. कोरोना नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनदेखील चिंतेत आहे.

12 एप्रिल रोजी सोलापुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मृत्यूनंतर या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे.
सोलापूर-आज गुरुवारी ४ जून रोजी सायंकाळी सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत  ६४ ने वाढ झाली आहे. यामध्ये ४३ पुरुष व २१ महिलांचा समावेश आहे.आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत सोलापुरातील कोरोना एकूण रुग्ण संख्या ११४४ इतकी झाली आहे तर  एकूण बरे रूग्ण- ४८४ आहेत .आज पर्यंत ९९ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.
टेस्टसह आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले

12 एप्रिलपासून सोलापुरात अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत 653 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी यापैकी उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या देखील 279 इतकी आहे. रुग्ण आढळणे आणि बरे होण्याच्या प्रमाणात फार मोठी तफावत नसल्याने चिंता मोठी नसली तरी मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. शासकीय रुग्णालयात होणार्‍या कोरोना टेस्टच्या प्रमाणात देखील मोठी वाढ झाल्याने रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. महापालिकेने देखील आता स्वॅब घेण्यास सुरुवात केली आहे.




Comments