Breaking : अखेर एकूण संख्या 1040 तर आज नवे रुग्ण 48, तर एकाचा मृत्यू

आज मंगळवारी 2 जून रोजी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना बाधितांची संख्या 48 ने वाढली आहे. दिवसेंदिवस वेगाने वाढणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे सोलापूरकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ‘अनलॉक’ 1 मुळे सोलापूरकरांनी सोशल डिस्टन्स पाळून काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.


सोलापूरात नवे बाधित ४८, कोरोनामुक्त ४ तर एका महिलेचा मृत्यू, एकूण रुग्ण १०४०, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ४४७, मृत रुग्ण ९० तर ५०३ रुग्णांवर उपचार सुरु

 आज एकूण २३३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १८५ अहवाल निगेटिव्ह तर ४८ अहवाल पॉझिटिव्ह तर आज एका महिलेचा मृत्यू झाले असून अद्याप ६२२ अहवाल प्रलंबित आहेत.
आज आणखी ४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज कुमठा नाका परिसरातील ७५ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.




Comments