माढा लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला ?

 सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

सोलापूर :सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत झाली. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंग नाईक- निंबाळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यात मोठी लढत झाली.

दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या एका तासात पहिल्या फेरीचा लागणार निकाल लागणार आहे. सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण २ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामवाडीच्या  १८ गोदामात ३२ सीसीटीव्हींची नजर या मतमोजणी प्रक्रियेवर असणार आहे. पहिल्या फेरीनंतर प्रत्येक फेरीचा निकाल केवळ पंधरा मिनिटात लागणार आहे.


Comments