पंढरीतील कवठेकर प्रशालेसमोर वारंवार ट्रँफीक जँम.. शाळेसमोरच्या मार्गावर वाहतुकीचे तीन-तेरा


पंढरपूर- शहरातील नाथचौकानजीक असलेल्या कवठेकर प्रशालेसमोर वारंवार वाहतुकीची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते.
या ठिकाणी शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना व पालकांना जीव मुठीत धरून वावर करावा लागतो.  येथील वाहतुक सुरळीत होणेसाठी कसलेही नियोजन आजतागायत झालेले नाही. या शाळेत सध्या इयत्ता दहावीची परीक्षा देणेसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतु विस्कळीत वाहतूक नियोजनामुळे होणा-या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षेला वेळेत उपस्थित राहणेसाठी विद्यार्थ्यांची दमछाक होताना आढळत आहे.
या ठिकाणी वाहतुक पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Comments