उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संतभूमी मंगळवेढा येथे आगमन

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संतभूमी मंगळवेढा येथे आगमन; दामाजी चौकात जल्लोषात स्वागत

📍 दामाजी चौक, मंगळवेढा

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यात आगमनानिमित्त शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. दामाजी चौकात असंख्य शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत केले.

या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह श्री संत दामाजी पंत यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजाला संतांच्या कार्यातून नवी दिशा मिळते आणि त्यांच्या शिकवणीतून जनसेवेचे बळ मिळते, हा संदेश अधोरेखित करण्यात आला.

Comments