सोलापूरकरांनी एक कोटी खर्चून पाहिला बाहुबली; 39 लाख 64 हजार करमणूक कर वसूल
![]() |
| Bahubali 2 The Conclusion |
सोलापूर- रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या बाहुबली चित्रपटाने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. दोन आठवड्यात बाहुबली चित्रपटावर सोलापूरकरांनी एक कोटी रुपये खर्च करीत मनोरंजनाचा आनंद लुटला आहे. यातून करमणूक कार्यालयास ४० लाख रुपयांचा कर मिळाला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असून, तिसऱ्या आठवड्यातील आकडा अद्याप आला नाही. सव्वा कोटीहून अधिक रुपयांचे कलेक्शन सोलापूर शहरात झाले असून, ५० लाखांच्या पुढे कर मिळेल, असा विश्वास करमणूक कार्यालयाने व्यक्त केला.
दोन आठवड्यात करमणूक कार्यालयास ३९ लाख ६४ हजार रुपये कर मिळाला आहे. यामध्ये शहरातील ई-स्क्वेअर स्क्रीन कडून लाख ५३ हजार, स्क्रीन कडून लाख ८८ हजार, स्क्रीन कडून लाख २२ हजार, बिग सिनेमातील स्क्रीन कडून लाख ३८ हजार, स्क्रीन कडून लाख ९५ हजार, प्रभात चित्रपटगृहाकडून लाख ६२ हजार, उमा मंदिर ६९ हजार, चित्रमंदिर लाख ६९ हजार असा एकूण ३९ लाख ६४ हजार रुपयांचा करमणूक कर मिळाला आहे.
एक कोटीचा टप्पा आेलांडला
करमणूक कार्यालयाने दोन आठवड्यातील तिकीट विक्रीवरून ३९ लाख ६४ हजार रुपयांचा कर मिळाल्याचे सांगितले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चौथा आठवडा सुरू आहे. शिवाय तिसऱ्या आठवड्यातील तिकीट विक्रीची आकडेवारी अद्याप आली नाही. बाहुबली चित्रपटाने शहरात कोटी रुपयांची आकडेवारी ओलांडली असून, ५० लाखाचा महसूल मिळेल, अशी माहिती करमणूक कर अधिकारी अमोल कदम यांनी दिली.

Comments