सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?

 Solapur ZP Election Result : काही ठिकाणी भाजप विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र सोलापुरात पाहायला मिळालं.

सोलापूर : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येथील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. तर, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशी अनुक्रमे उमेदवारांची संख्या आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील 11 तालुक्यांना आहे.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत बार्शी आणि माढा येथे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपाविरुद्ध एकत्र आली आहे. तर, बार्शीत दोन शिवसेना एकत्र येत महाआघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे, या दोन तालुक्यातील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. तर, शहाजी बापू पाटील यांच्या सांगोल्यात, मोहिते पाटलांच्या माळशिरसमध्येदेखील काय होणार याची उत्सुकता जिल्ह्याला आहे. माळशिरस येथे पंचायत समितीसाठी सर्वाधिक 18 जागा आहेत. पंढरपूरात 16, तर, सांगोल्यात 14 जागा आहेत.


करमाळा

माढा

बार्शी

सोलापूर उत्तर

सोलापूर दक्षिण

मोहोळ

पंढरपूर

माळशिरस

सांगोला

मंगळवेढा

अक्कलकोट


सोलापूर जिल्हा परिषद जागा आणि उमेदवार

एकूण जागा - 68 

एकूण उमेदवार - 271


कोणत्या पक्षाचे किती उमेदवार :- 

भाजप- 59

शिवसेना - 24

राष्ट्रवादी - 26

ठाकरे गट - 8

काँग्रेस - 18

श गट - 21

वंचित - 11

स्थानिक गट - 15 


पंचायत समितीची माहिती :- 

जिल्ह्यातील एकूण पंचायत समित्या - 11

एकूण जागा - 136 

एकूण उमेदवार - 485 


पंचायत समितीनिहाय जागा आणि उमेदवार

करमाळा - जागा : 12, उमेदवार : 46

माढा - जागा : 14, उमेदवार : 50

बार्शी - जागा : 12, उमेदवार : 36

सोलापूर उत्तर - जागा : 6, उमेदवार : 22

मोहोळ - जागा : 12, उमेदवार : 41

पंढरपूर - जागा : 16, उमेदवार : 70

माळशिरस - जागा : 18, उमेदवार : 54

सांगोला - जागा : 14, उमेदवार : 54

मंगळवेढा - जागा : 8, उमेदवार : 25

सोलापूर दक्षिण - जागा : 12, उमेदवार : 52

अक्कलकोट - जागा : 12, उमेदवार : 35



Comments