चालू घडामोडी 11 व 12 एप्रिल 2020 ( Current Affairs 11 & 12 April 2020 )
Daily Important Current Affairs For the competitive exams like MPSC, PSI, IAS etc. If you like this section please share with your friends.
चालू घडामोडी 11 व 12 एप्रिल 2020 ( Current Affairs 11 & 12 April 2020 )
नाणेनिधीच्या सल्लागार गटात रघुराम राजन यांचा समावेश
☑ नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ही निवड केली असून, इतर सदस्यात सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री थरमन शण्मुगरत्नम, मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक क्रिस्टिन फोर्बस, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हीन रूड, संयुक्त राष्ट्रांचे माजी उप महासचिव लॉर्ड मार्क मलोच ब्राऊन यांचा समावेश आहे.
इंटरपोलने रुग्णालयांवर सायबर हल्ल्याबद्दल धोक्याची सूचना देण्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली
☑ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) यांनी आपल्या सर्व 194 सदस्य देशांना रुग्णालयांवर होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्याबद्दल धोक्याची सूचना दिली आणि त्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली आहे. रुग्णालयात वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रे रॅन्समवेअर या तंत्राच्या माध्यमातून हॅक करून खंडणी मागितली जाते.
☑ आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL / इंटरपोल)
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून जगभरात त्याची 187 कार्यालये आहेत.
इंटरपोल ही 194 सदस्य-देश असलेली आंतरराष्ट्रीय संस्था असून पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा संस्थेला 100 वर्षांचा अनुभव आहे. ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते.
संघटनेकडून देशांना विविध प्रकारच्या ‘संभाव्य धोक्याच्या’ सूचना दिल्या जातात, ते आहेत -
- गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरल्या जाणार्या ‘मोडस ऑपरेंडी’ संबंधीची माहिती मिळविण्यासाठी किंवा ती देण्यासाठी ‘पर्पल नोटिस’ जाहीर केली जाते.
- गुन्हेगाराला अटक करण्यासाठी आणि त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यासंदर्भात ‘रेड नोटिस’ जाहीर केली जाते.
- हरविलेल्या व्यक्तीचा शोध आणि ओळख पटविण्यात मदत करण्यासाठी ‘यलो नोटिस’ जाहीर केली जाते.
- एखाद्या व्यक्तीची ओळख, ठिकाण किंवा गुन्ह्याविषयीच्या क्रियाकलापांविषयी अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी ‘ब्लू नोटिस’ जाहीर केली जाते.
- अज्ञात मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी किंवा माहिती मिळविण्यासाठी ‘ब्लॅक नोटिस’ जाहीर केली जाते.
- एखाद्या व्यक्तीच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल धोक्याचा इशारा देण्यासाठी ‘ग्रीन नोटिस’ जाहीर केली जाते.
- सार्वजनिक सुरक्षेसाठी एखादी व्यक्ती, वस्तू, घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चेतावणी देण्यासाठी ‘ऑरेंज नोटिस’ जाहीर केली जाते.
आशियाई विकास बँक भारताच्या मदतीला
☑ आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे.
☑ या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.☑ त्याचबरोबरकर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे.
२६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.
☑ आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल.
☑ बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.
अन्न वाटपाच्या सेल्फी आणि फोटोवर बंदी :
☑ मात्र, काहींनी मदत करतानाचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. अशांवर आता गुन्हे दाखल होणार आहेत. अन्न पदार्थ आणि जेवण वाटणाऱ्यांनी जर त्याचा फोटो काढला तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अजमेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.
☑ तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करत त्यांच्यावर भा. दं. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकारी विश्व मोहन शर्मा यांनी दिली.
लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात ‘व्ही सेफ टनेल’ स्थापन
☑ ‘व्ही सेफ टनेल’ लोकांच्या स्वच्छतेसाठी तेलंगणात स्थापन करण्यात आले आहे.
राज्य पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात तेलंगणामध्ये ‘व्ही सेफ टनेल’ बसविण्यात आले आहे
लोकांमध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित करण्याचे उद्दिष्ट सदर संकल्पाचे आहे.
☑ राज्यातील कोरोना विषाणूचा स्थानिक प्रसार कमी करण्यासाठी ‘व्ही सेफ टनेल’ नावाचा एक अनोखा जंतुनाशक कोणत्याही संभाव्य जीवाणू आणि इतर सूक्ष्मजंतूंपासून लोकांना बचावण्याचे कार्य करतो.जंतुनाशकांमध्ये स्प्रेच्या रूपात जलविद्राव्य पॉलिमर आणि आयोडीनचे मिश्रण समाविष्ट आहे.
हे पण पहा

Comments