सोलापुरात एका दिवसात सापडले 21 रुग्ण

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून आज (गुरुवारी) एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.


सोलापुरात 102 पेशंट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आजपर्यंत सहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे हेही त्यांनी सांगितले. आजच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. तीन पेशंटना आज निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने डिस्चार्ज दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काल सोलापूर मध्ये 81 बाधित रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती. मात्र आज एकाच दिवसात 21 रुग्णांची भर पडली आहे. हे पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.

एकाच दिवशी तब्बल एकवीस रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी जिल्ह्यात एकूण आकडा ८१ होता. त्यात सहा रुग्ण मयत असल्याची नोंद असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली त्यासोबतच भरणे यांनी लोकांना घराबाहेर पडू नये . स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले.

आज गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी सविस्तर वैद्यकीय अहवाल आणि सोलापूरची सद्यस्थिती आकडेवारीसह सांगतील तेव्हा नेमके कोणत्या परिसरात किती रुग्ण झाले आहेत याची माहिती मिळेल.

Comments