सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू

तीन डॉक्टर व एका नर्सला 'कोरोना'ची बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आता शहरातील एका नगरसेवकासह चार जणांना 'कोरोना'ची बाधा झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. हे नगरसेवक फॉरेस्ट चांदणी चौकातील रहिवाशी आहेत. शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालात एका रुग्णाला एन्फ्यूएन्जा, एकाला सारी तर दोन जणांना कोरोणाची लाग झाल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले. अशाप्रकारे जिल्ह्यातील कोरणा रुग्णांची संख्या एकूण ६५ इतकी झाली आहे.

काल सोलापूर जिल्ह्यात 61 बाधित संख्या होती आज त्यामध्ये 4 ची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 65 झाली आहे.त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.


आज ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत त्यापैकी एक व्यक्ती न्यू तिर्हेगाव फॉरेस्ट चांदणी चौक परिसरातील, दुसरी व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील आहे. तर दोन व्यक्ती शास्त्रीनगर परिसरातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 65 व्यक्ती बाधित आढळून आले आहेत त्यापैकी पाच व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे .60 व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत .आज एकूण 23 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 19 अहवाल हे निगेटिव्ह आढळून आले तर चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.


Comments