कोरोना व्हायरस कसा दिसतो? बघा भारतीय शास्त्रज्ञांनी लावला शोध

नवी दिल्लीः जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरसविरोधात लस शोधण्याचे प्रयत्न अमेरिका, चीनसह अनेक बलाढ्य देशांकडून सुरू आहेत. पण करोना व्हायरस कसा दिसतो? याचा शोध भारतीय शास्त्रज्ञाने लावला आहे. त्याचे फोटोही समोर आले आहेत.


असा दिसतो कोरोना व्हायरस
भारतीय शास्त्रज्ञांनी मायक्रोस्पद्वारे (सूक्ष्मदर्शकयंत्र) कोरोना व्हायरसला टिपले आहे. SARS-CoV-2 virus (COVID19) हा करोना व्हायरस नेमका कसा दिसतो ते फोटोतून समोर आले आहे. भारतात केरळमध्ये ३० जानेवारीला करोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या घशातील लाळेचे नमुने शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी घेतले. या नमुन्यांची तपासण्यात करोना व्हायरस स्पष्टपणे दिसून आला. १० एनएमचा हा व्हायरस असल्याचं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलंय.इंडियन जरनल ऑफ मायक्रोबायोलॉजी रिसर्चच्या (IJMR) अंकात ही माहिती देण्यात आली आहे.

Comments