कोरोनाच्या संकटात सुरेश भटांची धैर्य देणारी कविता..

आज संपुर्ण जग कोरोना व्हायरस च्या दहशतीत जगतंय. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण सर्व लॉकडाऊनचं पालन करत आहोत. या लॉकडाऊनमध्ये  कवी सुरेश भट यांची प्रेरणादायी कविता शेअर केली आहे.
 


कोणाला लॉकडाऊन असह्य झाला असेल. तर कोणी कोरोनाची प्रचंड धास्तीही घेतली असेल. सोबतच डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे या लढ्यात आपले आपले प्राण धोक्यात आहेत ही पुर्ण कल्पना असतानाही पुढे होऊन जोमाने लढत आहे. या लढवय्यासाठी कवी सुरेश भट यांची ही कविता नक्कीच प्रेरणादायी ठरेल..  ‘विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही’… 

पाहा व्हिडीओ

सुरेश भट यांची अप्रतिम कविता:

 विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही..

Comments