कोरोनाचा मोहोळमध्ये प्रवेश
अद्यापही 176 रिपोर्ट येणे बाकी आहे 61 रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत काल शनिवारी हा आकडा 50 होता आज त्यामध्ये 11 ची भर पडली आहे त्यामुळे एकूण आकडा 61 झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी सायंकाळी बोलताना दिली
आज एका सारीच्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
शास्त्रीनगर परिसरातील दोन, पाच्छा पेठ परिसरातील एक ,कुर्बान हुसेन नगर परिसरातील एक ,कर्णिक नगर परिसरातील एक, यशवंत सोसायटी परिसरातील एक ,तालुका पोलीस स्टेशन परिसरातील एक, एस आर पी कँप सोरेगाव परिसरातील एक आयकर कॉलनी परिसरातील एक आणि एक रुग्ण मोहोळ तालुक्यातील आहे त्यामुळे कोरोनाचा प्रवेश मोहोळ तालुक्यात झाल्याचा दिसून येत आहे. ग्रामीण भागातील हा दुसरा रुग्ण आहे 11 रुग्णांपैकी पाच सारी आजाराचे आहेत. सहा हे याआधी पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत .56 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे
आज एका सारीच्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील पेनूर परिसरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह ; परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):मोहोळ तालुक्यातील पेनूर (पाटकुल) परिसरातील एका महिलेला त्रास होऊ लागल्याने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोहोळ तालुक्यात नागरिकांची पाचावर धारण बसली आहे.परिणामी परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असून प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या सात किलोमीटर पर्यंत कोन्हेरी, पेनुर,सारोळे, खवणी ही गावे बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत.मोहोळ तालुक्यातील मोहोळ-पंढरपुर रोडवरील पाटकुल हद्दीमध्ये एक महिला कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित तर सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पेनूर, पाटकूल येथील परिसराला भेट देऊन संबंधित भागातील परिसर कंटोन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे.नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोना मुक्तीसाठी बाहेर फिरू नये.लवकरात लवकर मोहोळ तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी पण घरातच राहून सहकार्य करावे असे त्यांनी पेनूर पाटकूल सरपंच व समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रतिबंधित क्षेत्रातील मंजूळा स्टिल सेंटर ,काळे वस्ती ,माने वस्ती,भोसले वस्ती हायस्कूल, धोंडीराम निंबाळकर वस्ती,कोन्हेरी शिव, शेटे वस्ती,तांबोळे वस्ती ,चवरे वस्ती, सर्जेराव चवरे वस्ती, शेख वस्ती,खराटे वस्ती ,जुगदार वस्ती व सारोळे शिवसह तीन किमी परिसरातील १४ वस्त्या वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्या आहेत.प्रतिबंधीत क्षेत्राच्या सिमेपासून ७ किमीपर्यंतचे पाटकूल व पेनूर परिसरातील गावठाणापासून कोन्हेरी गाव, खवणी शिव, पोखरापूर शिव, सारोळे गाव, खवणी गाव हे क्षेत्र बफर झोन म्हणून प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी जाहीर केले आहे.
कोरोणा विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. रविवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदींनी मोहोळ तालुक्यातील संबंधित ठिकाणी भेट दिली.यांसह तालुका आरोग्य अधिकारी,मंडलाधिकारी,ग्रामआपत्ती समिती अध्यक्ष बुध्दाजी बेले, ग्रामसेवक,पोलीस पाटील तुकाराम कारंडे आदी उपस्थित होते.

Comments