मोहोळ शहरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनरने तपासणी सुरु

मोहोळ (प्रतिनिधी) शहरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनर मार्फत तपासणी होण्यासाठी सीमा पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे मागणी केली होती .तसेच सोलापूर  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे थर्मल स्कॅनर ची मागणी मोहोळच्या शिवसेना नगरसेविका सीमा पाटील यांनी केली होती .या मागणीची दखल घेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्तात्रेय भरणे यांनी मोहोळ नगर परिषदेसाठी तीन थर्मल स्कॅनिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.


मोहोळ नगर परिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा पाटील यांनी मोहोळ शहरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनर तपासणी व्हावी यासाठी  मागणी केली होती. त्याचबरोबर या मशीन त्वरित प्राप्त करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री  दत्तात्रेय भरणे यांना  निवेदनाची प्रत देण्यात आली होती  . सुचनेवरून  पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मोहोळ शहरातील नागरिकांची मशीनद्वारे तपासणी करण्यासाठी तात्काळ मशीन उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यानुसार आज मोहोळ  शहरांमध्ये प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनर मशिनने  शरीरातील तापमान तपासण्याची  मोहीम सुरू करण्यात आली कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने  कोरोना विषाणूवर मात करून रुग्ण शोधून त्याची लक्षणे शोधणे महत्त्वाचे आहे म्हणून थर्मल स्कॅनर्स ने तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.मोहोळ मधील  प्रत्येक नागरिकांनी न घाबरता घरातील प्रत्येकाने या मशीनने  तपासून करून घेऊन मोहिमेला सहकार्य करावे आणि  आपल्या मोहोळ शहराला कोरोना रिक्तच ठेवावे असे अवाहन शिवसेनेच्या नगरसेविका सीमा पाटील यांनी केले. त्याचबरोबर मा.पालकमंत्री दत्तात्रेय भरणे,  जिल्हाधिकारी साहेब  यांचे आभार सीमा पाटील यांनी  मानले .तथापि मोहोळ शहर हे सुमारे चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेले शहर असून यामध्ये अनेक वाड्या वस्त्याचा समावेश आहे त्यामुळे वीस थर्मल स्कॅनर सह तपासणीच्या वेगवेगळ्या 20 टीम करणे व एकाच वेळी सगळीकडे तपासणी होणे गरजेचे आहे त्याचबरोबर या टीम मध्ये काम करणाऱ्या अशा वर्कर्स यांना नगरपरिषदेने पुरेसे मानधन द्यावे व या सर्वांना सुरक्षा किट द्यावे अशी मागणी सीमा पाटील यांनी केली यावेळी  या तपासणी टीम सोबत नगरसेविका सीमा पाटील,  पाणीपुरवठा इं. अमित लोमटे बांधकाम इं. अक्षय खटके, विद्युत इं. राजकुमार सपाटे , संगणक इंजि महेश माने रोहित कांबळे डॉ मोहिते  ,आरोग्य सेविका श्रीमती भगत, नगरपरिषदेचे अरुण मांडवे ,कोंडीबा देशमुख , संतोष माळी, अभिजीत पवार विकी कोळी, मोहित शेख उपस्थित होते.

Comments