चालू घडामोडी (Marathi Current Affairs) 10 April 2020

Daily Important Current Affairs For the competitive exams like MPSC, PSI, IAS etc. If you like this section please share with your friends.




चालू घडामोडी 10 एप्रिल 2020 ( Current Affairs 10 April 2020 )



चंद्रावरील NASA संस्थेचा ‘आर्टेमिस’ अंतराळ कार्यक्रम

  • 2024 सालापर्यंत पृथ्वीच्या चंद्रावर मानवाला जीवन जगण्यासाठी पाठविण्याची महत्वाकांक्षी योजना अमेरिका देशाच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी आखली आहे. योजनेनुसार चंद्राच्या भूमीवर मानवाला राहण्यायोग्य एक तळ उभारले जाणार आहे, ज्याला “आर्टेमिस बेस कॅम्प” म्हटले जाणार.
  • चंद्राचा शोध घेण्यासाठी मानवाने दीर्घ काळासाठी एखादी मोहीम राबविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात असलेल्या ‘शॅक्लेटॉन क्रेटर’च्या मध्यात हे तळ उभारले जाणार आहे, जिथे चार लोकांची व्यवस्था असणार आहे.
महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी 

  • भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे. भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार.
  • कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्के झाला 

  • सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या मध्याकाळात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 8.40 टक्क्यांवरून 23.4 टक्के झाला आहे.
  • तर शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढून 30.90 टक्के इतका झाला आणि एकूणच हा दर 23.4 टक्क्यांवर पोहचलेला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ही एक अग्रणी व्यवसायिक माहिती कंपनी आहे जिची स्थापना 1976 साली झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे आणि एस. ए. दवे हे कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एका वर्षासाठी सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय

  • कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एका आर्थिक वर्षासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांसह सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करून तो निधी कोविड-19 महामारी विरुद्ध लढ्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच, 2020-21  आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षासाठी खासदार स्थानिक क्षेत्र  विकास निधी (MPLAD) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निधी देशात कोविड-19 चा प्रतिकूल परिणाम आणि रोगामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न बळकट करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
  • खासदारांना दरवर्षी खासदार निधी देण्यात येतो. सर्व खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये या खासदार निधीचा विकास कामांसाठी वापर करत असतात.
भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार
  • जगभरात लाखो लोकांना लागण झालेल्या कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे.  भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.
  • या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘लाइव्ह अटेन्युएटेड सार्स – सीओव्ही-2 लस’ किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.
  • संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.
  • कोडोना डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानामुळे आम्ही एंटेरोवायरस सी (पोलिओवायरस), ह्युमन इम्युनोडेफिशीअन्सी वायरस टाइप 1, झिका वायरस अशा विविध आरएनए विषाणूंचा प्रसार यशस्वीरित्या कमी करू शकलो आहोत.

Comments