चिंता वाढली : एकाच दिवशी कोरोनाचे 1230
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1230 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 23,401आहे. तर दिवसभरात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या चौदा हजारावर गेली आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 20 जण मुंबईचे तर पुण्यातील 3, सोलापूर 5, ठाणे 2, अमरावती ,औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी आणि वर्धा शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. राज्यात आतापर्यंत 868 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 587 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 18 हजार 917 नमुन्यांपैकी 1 लाख 93 हजार 457 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 23,401 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 48 हजार 301 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 192 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 4786 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 23 पुरूष तर 13 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 43रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 36 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.