उच्चांकी तापमानानंतर सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

सोलापूर : पाच- सहा दिवसात सोलापूर शहर व जिल्ह्याचे तापमान उच्चांकी झाले होते. ४३.६ तापमान झाल्यानंतर वातावरणात कमालीचा उकाडा निर्माण झाला होता. आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटार पावसाने हजेरी लावली.


माढा तालुक्यातील उपळाई परिसरात गारांचा पाऊस पडला. 5 मे रोजी 43.2, सहा, सात व आठ मे रोजी सलग तीन दिवस ४३.६ अंश सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली होती. नऊ तारखेला तापमानाचा पारा घटला. 41.3 सेल्सिअस एवढी नोंद 9 मे रोजी झाली. आज 10 मे रोजी सोलापूरचा पारा आणखी घसरला. आज सोलापूर शहर व परिसरात 39.6 अशी नोंद झाली. दुपारपर्यंत उन्हाचा चटका आणि सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व जोरदार वारे सुटले होते.

माढा, मोहोळ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. करमाळा तालुक्यातील हिसरे, फिसरे व पांडे या भागात देखील गारांचा पाऊस झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, द्राक्ष, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता होत असलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच काही ठिकाणी द्राक्षबागा ह्या अंतिम टप्प्यात आहेत. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बार्शीत विजांचा कडकडाट आणि वादळी  वाऱ्यासह मुसळधार  अवकाळी पाऊस
मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली होती तसा उकाडा ही वाढला होता आज सायंकाळी पाच वाजलेपासून सुरू झालेला पाऊस बराचवेळ सुरू होता शहरातील रस्ते आणि गटारी जलमय झाले होते