सोलापुरात पोलिस नाईक साखरे यांचा ड्यूटीवरच मृत्यू
सोलापूर : जेलरोड पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 1) ठाणे अंमलदार म्हणून शिवानंद साखरे (वय 38) काम पाहत होते. सकाळी 8 ते रात्री 8 अशी ड्यूटी होती. ड्यूटी संपण्यास एक तास शिल्लक असतानाच त्यांना अटॅक आला. उपचारासाठी त्यांना यशोधरा हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत्यू झालेले साखरे केशवनगर पोलिस वसाहतीत त्यांच्या कुटुंबीयासमवेत राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि बहीण आहे. दरम्यान, साखरे यांचा मृत्यू ऍटक आल्याने झाला, मात्र मृत्यूनंतर त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी घेतले का, त्यांना ऍटक कोणत्या कारणाने आला, याबाबत संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीच सांगितले नाही.

Comments