कोरोना अपडेट : सोलापुरात वाढले तब्बल 32 रुग्ण

आज शनिवारी दि. 23 मे रोजी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 32 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.यात 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या 548 झाली आहे. तर एकूण बरे रुग्ण 224 आहेत.त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दरम्यान आज पर्यंत 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सोलापूर कोरोनाचा आजचा अहवाल

शनिवार, दि. 23/05/20 सकाळी 8.00 वाजेपर्यंतची स्थिती
आजचे तपासणी अहवाल -135
पॉझिटिव्ह- 32 (पुरुष- 21, स्त्री- 11)
निगेटिव्ह- 103
एकूण पॉझिटिव्ह- 548
एकूण निगेटिव्ह - 4781
एकूण चाचणी- 5329
एकूण मृत्यू-40
एकूण बरे झालेले रूग्ण- 224