सोलापुरात एकाच दिवशी 50 रुग्णांची वाढ….
सोलापुरातील करोना बाधितांची संख्या आता435 इतकी झाली आहे.आज सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आज आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये 16महिला तर 34 पुरुष आहेत.आज सोमवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 नवे रुग्ण आढळून आले होते.त्यावेळी एकूण रुग्ण संख्या ही 390 इतकी झाली होती.आता ती 435 झाली आहे.
आज एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 269 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3 हजार 983 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 29 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 165 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
आज मयत झालेली पहिली व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील 54 वर्षांचे पुरुष असून 16 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 17 मे रोजी दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली दुसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील असून ६० वर्षाचे पुरुष आहेत 15 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 16 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती शुक्रवार पेठ परिसरातील असून ५५ वर्षांची पुरुष आहेत. 14 मे रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 15 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज नव्याने आढळलेल्या 50 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नीलम नगर परिसरातील चार पुरुष, किसन संकुल अक्कलकोट रोड येथील एक महिला, हत्तुरे वस्ती येथील एक पुरुष, इरण्णा वस्ती येथील एक पुरुष, जोशी गल्ली येथील एक पुरुष व एक महिला, कुमठा नाका येथील तीन पुरुष व दोन महिला, बुधवार पेठेतील एक पुरुष व एक महिला, जुना कुंभारी नाका येथील एक महिला, अशोक चौकातील दोन महिला, नइ जिंदगी येथील एक पुरुष, दत्त चौकातील एक पुरुष, न्यू पाछा पेठेतील एक महिला, इंदिरानगर येथील एक पुरुष, लोकमान्य नगर येथील एक पुरुष, मिलिंद नगर न्यू बुधवार पेठ येथील सात पुरुष व पाच महिला, मोदी येथील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील एक पुरुष, पाछा पेठेतील दोन पुरुष, रेल्वे लाईन येथील दोन पुरुष, रविवार पेठेतील दोन पुरुष व एक महिला, साईबाबा चौकातील एक पुरुष व एक महिला, साठे पाटील वस्ती येथील एक पुरुष, शिवशरण नगर एमआयडीसी येथील एक पुरुष, सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुष अशा 50 जणांचा समावेश आहे.
कोरोना मुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 245 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.