सोलापुरातील आज 8 जणांचा मृत्यू ; वाढले 14 बाधित

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आज आज शनिवारी सायंकाळी 14 बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याची माहिती देण्यात आली आहे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये पाच पुरुष तर तीन महिलांचा समावेश होतो. एकूण रुग्ण ८६५, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ३८०, मृत रुग्ण ८३ तर ४०२ रुग्णांवर उपचार सुरु. आज २९ रुग्ण झाले बरे.


आज आढळलेले रुग्ण
उत्तर कसबा परिसर दोन पुरुष
मरीआई चौक दमानी नगर 1 महिला
सरवदे नगर एक पुरुष
गांधीनगर अक्कलकोट रोड एक पुरुष
बुधवार पेठ एक महिला
जुना विडी घरकुल दोन पुरुष एक स्त्री
आंध्र तालीम लष्कर एक पुरुष
मोदी परिसर एक महिला
कुमठा नाका एक महिला ,
अंबिका नगर जुना विडी घरकुल एक पुरुष
नीलम नगर एक पुरुष
आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 865 इतकी झाली आहे यामध्ये पुरुष 495 तर महिला 370 आहेत

आज आठ जणांचा मृत्यू झाला आहे

यामध्ये अक्कलकोट रोड परिसरातील गांधीनगर भागातील 45 वर्षाचे पुरुष,  त्यानंतर 61 वर्षाची महिला ज्या नरसिंह नगर मोदी परिसरात राहत होत्या.तिसरी व्यक्ती भवानी पेठ परिसरातील 72 वर्षाचे पुरुष आहेत .अवंती नगर परिसरातील 69 वर्षाची महिला ,

जुना विडी घरकुल परिसरातील 67 वर्षाचे पुरुष ,बाळीवेस परिसरातील 62 वर्षाची महिला ,उत्तर कसबा परिसरातील 61 वर्षाचे पुरुष आणि वेणुगोपाल नगर परिसरातील 41 वर्षाचे पुरुष मृत्यू पावल्याची माहिती देण्यात आली आहे.





Comments