बाप रे …एकाच दिवशी 81 बाधित रुग्ण ; 6 मयत

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज 268 अहवाल प्राप्त झाले असून 187 अहवाल निगेटिव्ह आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल 81 आहेत ज्यामध्ये 38 पुरुष 43 महिलांचा समावेश होतो तर आज सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे आजपर्यंतची एका दिवसांत असणारी ही सर्वात मोठी बाधितांची आकडेवारी आहे.


एकूण रुग्ण ७४८, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ३२१, मृत रुग्ण ७२ तर ३५५ रुग्णांवर उपचार सुरु
सोलापूर (२८ मे) - आज एकूण २६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १८७ अहवाल निगेटिव्ह तर ८१ अहवाल पॉझिटिव्ह तर आज आणखी तिघांचा मृत्यू झाले असून अद्याप ६५६ अहवाल प्रलंबित आहेत. तर आज जामगाव, ता. बार्शी, जुना विडी घरकुल, शास्त्री नगर, किडवाई चौक, बेगम पेठ, रविवार पेठ, भवानी पेठ परिसरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.





Comments