धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत .या बाधित रुग्णांमध्ये 40 पुरुष तर 44 महिला आहेत आज पाच जणांचा बळी गेला असून यामध्ये तीन पुरुष तर दोन महिला आहेत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 949 इतकी झाली आहे.
अक्कलकोट व बार्शी तालुक्यात वाढला आकडा. एकूण रुग्ण ९४९, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ३९४, मृत रुग्ण ८८ तर ४६७ रुग्णांवर उपचार सुरु


रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 14 इतकी असून यामध्ये पाच पुरुष आणि नऊ महिला आहेत.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले बाधित यांची संख्या 394 इतकी झाली असून यामध्ये 215 पुरुष तर 179 महिला आहेत तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाजी त्यांची संख्या ही 467 इतकी आहे यामध्ये 266 पुरुष तर 201 महिलांचा समावेश होतो.





Comments