सोलापुरात नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

आज 187 जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 178 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल नऊ आलेले आहेत. ज्यामध्ये चार पुरुष तर पाच स्त्रियांचा समावेश आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या निगेटिव्ह रुग्णांची संख्या सात आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रात्री 8 च्या सुमारास दिली.


शास्त्रीनगर येथील शानदार चौकातील तीन पुरुष ,एक स्त्री तर संतोष नगर बाळे येथील एक पुरुष ,ताई चौक रवींद्र नगर येथील एक स्त्री व एक पुरुष, तेलंगी पाच्छा पेठ येथील एक स्त्री तर न्यू पाच्छा पेठ येथील एक स्त्रीचा समावेश आजच्या बाधित व्यक्तीमध्ये होतोय.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ही 111 झाली असून पुरुष 64 स्त्री स्त्रिया 47 आहेत तर मृतांची संख्या ही सहा आहे. रुग्णालयात दाखल असलेले बाधित 95 असून त्यापैकी 54 पुरुष तर 41 स्त्रियांचा समावेश यामध्ये होतो. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

आज सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 1860 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 1531 जणांची निगेटिव्ह तर 111 जणांची पॉझिटिव्ह चाचणी आली आहे.
आज 9 रुग्ण मिळाले आहेत. यात 4 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे.
सोलापुरातील कोरोना बाधितानची संख्या आता 111 इतकी झाली आहे. दरम्यान आज आणखीन 7 जणांना त्यांची 14 दिवसानंतरची चाचणी निगेटिव्ह आल्यानं रुग्णालयातून सोडून देण्यात आलं. कालपासून 10 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.
कालपर्यंत सोलापुरात 102 कोरोना बाधित रुग्णांची संख्या होती. यातील 6 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे तर इतर 95 जणांवर उपचार सुरु होते. त्यातील 3 जणांची काल कोरोना चाचणी निगेटीव्ह आली, त्यापाठोपाठ आज आणखीन 7 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्व 10 व्यक्तींना घरी सोडण्यात आलं आहे.

 यात शास्त्रीनगर 3 पुरुष 1 महिला, बाळे संतोषनगर 1 पुरु  ताई चौक रवींद्र नगर नगर-1 पुरुष ,1 महिला तेलंगी पाच्छा पेठ 1 महिला,  न्यू पाच्छा पेठ 1 महिला असा समावेश आहे.

देशातील तिसऱ्याला लॉक डाऊन ची घोषणा आज गृहमंत्रालयाकडून झाली आहे .लॉक डाऊन 17 मे पर्यंत  सुरू राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन सरकारनं राज्यनिहाय जिल्ह्यांची विविध झोनमध्ये  वर्गवारी केली आहे. यानुसार सोलापूर जिल्हा रेड झोनमध्ये हे समाविष्ट झाला आहे.

 आज एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस यानिमित्ताने  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले .कोरोना विषाणू संसर्ग सावट पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणात हा कार्यक्रम पार पडला.