करमाळा शहरामध्ये १२मे पासून तीन दिवसाचा जनता कर्फ्यू

नागरिकांनी सहकार्य करणे बाबत नगराध्यक्ष वैभवराजे यांनी केले आवाहन

करमाळा: : सध्या सोलापूर जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन संसर्ग बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता कोरोना विषाणूची साखळी तोडणेकामी करमाळा शहरातील व्यापारी प्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार दि.१२ मे ते 14 मे या तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित केलेले आहे. 


 या कालावधीत दुध पुरवठा सकाळी ६ ते ९, मेडिकल व दवाखाने एवढयाच अत्यावश्यक सेवा चालु राहणार आहेत. सदर बैठकीसाठी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक सजंय सावंत, प्रविण जाधव,  अतुल फंड, प्रशांत ढाळे, महादेव फंड, शौकत नालबंद, , सचिन घोलप, , या बरोबर किराणा व्यापारी संघाचे अमोदशेठ संचेती, भाजपाचे गणेश चिवटे, जगदिश आग्रवाल, राधेशाम देवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणकाका जगताप, कै.बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड, शिवसेनेचे महेश चिवटे, प्रविण कटारिया, कापड व्यापारी पिंटू कटारिया, वंदे मातरम शक्ती सेनेचे सुहास घोलप, आदिजण सर्व उपस्थितीत होते.

 सदर बैठकीमध्ये मा.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जीवनावश्य्क वस्तु खेरीज इतर दुकाने आस्थापना चालु करताना दुकानदारांनी सॅनिटाझरचा वापरणे सोशल डिस्टींग पाळणे, तसेच दुकानामध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेणे बाबत मा.नगराध्यक्ष वैभवराजे यांनी बैठकीमध्ये सर्व दुकानदार, पदाधिकारी यांना सुचना दिल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणेसाठी दि.१२ मे पासून ३ दिवसाचा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्व व्यापारी वर्ग, नागरिकांनी सहकार्य करणे बाबत नगराध्यक्ष वैभवराजे यांनी आवाहन केले.