सोलापुरात `रोहयो`तून १७८ विहिरींसह रस्ते कामांना मंजुरी
सोलापूर: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या लॅाकडाउन सुरु आहे. परिणामी, मजुरांच्या हाताला काम नाही, आता शेतीविषयक सर्वच कामांना सूट दिलेली असली, तरी काम नव्हते. त्यामुळे प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १७८ विहिरींसह, रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पण 'कोरोना’च्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अटींवर ही कामे होणार आहेत.
प्रशासनाने दिलेल्या या मंजूरीत हगलूर ते बक्षीहिप्परगा या पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्येही कामांची मागणी होत आहे. वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे सुरू होणार आहेत. मजुरांची मजुरी २०६ रुपयांवरून २३८ रुपये झाली आहे. जिल्ह्यात ७७ हजार ६०० नोंदणीकृत मजूर आहेत. १५ हजार ६५८ कामे प्रस्तावित आहे. त्यापैकी सिंचन विहिरीच्या १८८ कामांना मंजुरी देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ही कामे करताना मजुरांना सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच अटीवर ही मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.
तालुकानिहाय मंजूर विहिरी : अक्कलकोट ९, बार्शी ३९, करमाळा १, माढा ४२, माळशिरस ३, मंगळवेढा ६, मोहोळ ४१, पंढरपूर ४, सांगोला २१, उत्तर सोलापूर ६, दक्षिण सोलापूर ६.