शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथे पोहोण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय.ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
उघडेवाडी येथील नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास असणारे शामराव भगत हे कुटुंबासह कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन व उन्हाळा सुट्टीनिमित्त गावी वास्तव्यात आले होते.
दरम्यान,शुक्रवारी दुपारी हर्षद शामराव भगत (वय १२) व सिद्धार्थ शामराव भगत (वय ९) हे पाण्यात बुडाल्याची माहिती त्यांच्याबरोबर गेलेला पार्थ संतोष भगत याने सांगितली या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत शेततळ्यातून बाहेर काढले.
त्यानंतर उपचारासाठी वेळापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करून नंतर अकलूज येथे नेण्यात आले दरम्यान,त्या दोघांचाही मृत्यू झाला.