लॉकडाऊनने वैतागलेल्या मद्यपीने परमीट बार फोडून चोरली दोन लाखांची दारू

अक्कलकोट : येथील सोलापूर अक्कलकोट रोडवरील रुबी परमीट बार हॉटेलचे समोरील लोखंडी शटरला बाहेरुन लावलेले कुलूप तोडून हॉटेल मधील स्टॉक रुममाधील दारुचे व बिअरचे बॉक्स १ लाख ९४ हजार ४६० रूपयाची चोरी केली. लॉकडाऊनमध्ये दारुचे दुकान बंद असल्याने वैतागलेल्या मद्यपीनी पाळत ठेवून दारु लंपास केली.

याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. १६ मे रोजी सायंकाळी ते १८ मे रोजी सकाळी सातवाजणेपूर्वी अज्ञात चोरट्याने ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सिध्देश्वर हत्तुरे (वय ४२ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय राहणार स्टेशनरोड) यांनी फिर्याद दिली.

परमीटचे लायसन्स मल्लिकार्जुन शरणप्पा बिराजदार (रा.शिरवळ ता.अक्कलकोट ) यास २०१७ पासून चालविण्याकरीता दिले आहे. १९ मार्च २०२० राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेलवर येवुन असलेल्या दारूचा स्टॉक पाहुन तशी रजिस्टर नोंद करून गेले होते. त्यानंतर कोरोना विषाणूमुळे २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू असल्याने आम्ही दिनांक २१ मार्च रोजी राञी ८ वाजता हॉटेलचे सर्व दरवाजे बंद करून बाहेरून कुलुप लावुन बंद केले होते.

२३ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत असल्याने हॉटे उघडले नाही. कधी तरी हॉटेलकडे जावुन पाहणी केली जात होती. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ०६:०० वा.हॉटेल जवळ जावुन पाहणी केली होती. बंद केलेल्या दिवसांनंतर ७ ते ८ दिवसांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी हॉटेलचे सर्व कुलुपांना सिल करून गेले होते.

१८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी घरी जात असताना ओळखीचे प्रशांत सोमशेखर लोकापूर यांनी मोबाईलवर फोन करून तुमचे हॉटेलचे शटर उघडल्या सारखे दिसत असल्याचे सांगितले. जावून पाहिले असता हॉटेलचे समोरील शटर उचकटलेले होते. त्याचे कुलुप बाजुला पडलेले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसानी शटरची पाहणी केली.हॉटेलमध्ये जावुन पाहिले असता लोखंडी शटर उचकटल्याचे दिसले. हॉटेलमधील दारूचे बॉक्स, पॅक केलेले दारूचे बॉक्स कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले. जवळपास दोन लाखांची दारु चोरट्यांनी हडप केली.