'वाॅटर कप' स्पर्धेतील नंबर मिळवलेल्या गावाने सन्मान परत घेण्याची केली मागणी
माढा : पाणी फौंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वडाचीवाडी ( अंजनगाव उमाटे) या गावात बक्षिसाच्या रकमेतून काम न झाल्याने बक्षिसाच्या रकमेसह सन्मान परत घ्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे केली आहे.
कायम दुष्काळात होरपळून निघणा-या गावक-यांनी पाणी फौंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत भाग घेऊन लहान, थोर, अधिकारी, पदाधिकारी यांनी श्रमदान केले. एक नवा इतिहास रचून तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला.जवळपास 10 लाख रुपयांचे बक्षिस गावाला मिळाले. मात्र या बक्षिसातून अद्याप गावात कामे झाली नाहीत.गावात वेळोवेळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी कामे करू, असे सांगायचे पण अद्यापपर्यंत काम झाले नाही. त्यामुळे मिळालेले प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह तहसील कार्यालयांकडे जमा करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बक्षिसाच्या रकमेतून कामे करण्यासाठी ग्रामसभा घेऊन कामे सुचवावी लागतात व ठराव घ्यावा लागतो. सध्या कोरोनामुळे ग्रामसभेला स्थगिती आहे. मासिक सभेतही कामाबाबत ठराव झाले नाहीत. त्यामुळे कामे करण्याबाबतच्या तांत्रिक गोष्टी करता आल्या नाहीत. ठराव घेतल्यानंतर कामाबाबत पुढील कारवाई करू, अशी प्रतिक्रिया समाधान यादव (ग्रामविकास अधिकारी ) यांनी दिली.
यावेळी अप्पासाहेब कोकरे, सचिन भोईटे, बालाजी कोकरे, औंदुबर भोईटे, सुजित कदम, देवीदास जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Comments