आज 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; एकूण 114

आज 32 जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 29 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत तर पॉझिटिव्ह अहवाल 3 आलेले आहेत. ज्यामध्ये तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. काल पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह संख्या ही 111 होती तर त्यात 6 मयत आणि 10 बरे होऊन घरी गेलेले आणि एकूण 95 जणांवर उपचार सुरू होता या संख्येत वाढ होत आज ही संख्या 114 झाली असून 98 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.


आकाशवाणी रोड वरील गवळी वस्ती भागातील एक पुरुष तर पोलीस मुख्यालय अशोक चौक येथील दोन पुरुषांचा समावेश होतो.

आयसोलेशन वॉर्डातील 1973 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सोळाशे 74 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत त्यापैकी पंधराशे 60 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 114 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही 299 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. घेरडी परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले 19, पेनुर येथील पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णाच्या संपर्कातील मोहोळ तालुक्यातील सोळा व  पंढरपूर तालुक्यातील 48 आणि चपळगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील अष्टयात्तर जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.