आजच्या सकाळच्या अहवालात 40 बाधित रुग्ण; 116 निगेटिव्ह

सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून सकाळचा कोरोना अहवाल आला नाही. माञ आज बुधवारी सकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. यावरुन आज शहारात सकाळच्या सञात एकूण 40 कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आता एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 80 वर गेला आहे.


आज सकाळी एकूण 156 तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 40 बाधित तर 116 निगेटिव्ह आढळले. सुदैवाने सकाळच्या सञात मृत्यूची नोंद नाही. आढळलेल्या 40 बाधित रुग्णांमध्ये 36 पुरुष , चार महिलांचा समावेश आहे. यांचा अधिक तपशील राञी प्रशासनाकडून प्राप्त होणार आहे.

- सोलापूर कोरोना
आजचा अहवाल
दि.3/06/20
सकाळी 8
आजचे तपासणी अहवाल - 156
पॉझिटिव्ह- 40 (पु. 36  स्त्रि-4 )
निगेटिव्ह- 116
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 1080
एकुण निगेटिव्ह - 6780
एकुण चाचणी- 7860
एकुण मृत्यू- 90
एकुण बरे रूग्ण- 447

Comments