संपूर्ण महाराष्ट्राला 'याड' लावणाऱ्या आर्चीचा अर्थात रिंकू राजगुरुचा आज वाढदिवस
'मराठीत सांगितलेलं कळंत न्हाय....? इंग्लिशमध्ये सांगू ?' असं म्हटल्यावर एक चेहरा सर्वांसमोर उभा राहतो. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटातून रिंकूने अभिनय विश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर अशी काही छाप पाडली की पाहता पाहता फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि परदेशातही तिच्याच नावाचा डंका वाजत होता. अशा या सर्वांच्याच लाडक्या 'आर्ची'चा म्हणजेच रिंकूचा आज वाढदिवस. या खास दिवसाच्या निमित्ताने तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
'आर्ची' ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारणारी रिंकू चित्रपट प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटली तरीही याच नावाने प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आर्चीचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.
किंबहुना 'सैराट'ची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बेधडकपणे वावरणं, गावात मोठ्या रुबाबात राहणं, प्रेमाची कबुली देण, त्याच प्रेमासाठी समाजाच्या आणि कुटुंबाच्या विरोधात जाणं हे 'आर्ची' साकारणाऱ्या रिंकूने सुरेखपणे निभावून नेलं होतं. धडधडणाऱ्या बुलेटवरुन येणारी हीच 'आर्ची' कोणीही विसरलेलं नाही.
या आर्चीने सर्वांनाच भुरळ घातली. ही आपली आर्जी म्हणजेच रिंकू राजगुरु आज 19 वर्षांची झाली आहे. प्रेक्षकांना सैराटमय करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरु मुळची अकलूजची असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. आता या शहराची चर्चा रिंकूमुळे जास्त होऊ लागली आहे. 'सैराट' या सिनेमातून रिंकूने मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली आणि आईवडिलांसोबतच आपल्या शहराचे नाव उंचावले. अकलूजमध्ये आईवडील, धाकटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत रिंकू वास्तव्याला आहे. अकलूजच्या संग्राम नगर येथे रिंकूचे घर आहे.

Comments