माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे कोरोना संशयित
वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे कोरोना संशयित रुग्णाच्या भीतीमुळे वेळापूरकर पुरे हादरून गेले आहेत. वेळापूर येथील एका कोरोना रुग्णास आरोग्य विभागाने ताब्यात घेतले असून त्याचा स्वॅब तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे.
प्रशासनाच्यावतीने खबरदारीचे उपाय म्हणून वेळापूरमधील संशयित रुग्णांच्या परिसरातील भाग सील करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने पुढील आदेश येईपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर व्यक्ती ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ड्रायव्हर असून तो २० मे रोजी बस घेऊन नागपूर येथे गेला होता तो परत २५ मे रोजी वेळापुरात आला होता. त्याच्या समवेत असणारा क्लीनर हा जत जिल्हा सांगली येथील असून तो कोरोना आजाराने बाधित झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरु झाला असता त्यामध्ये वेळापूर तालुका माळशिरस येथील सदर या ड्रायव्हरचे नाव आढळून आले आहे.
माळशिरस प्रशासन विभागाला माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, आणि महसूल विभाग यांनी वेळापूर मधील त्या ड्रायव्हरच्या राहत्या घरी जाऊन त्याची चौकशी केली असता सदर ड्रायव्हर हा वेळापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये ताप व खोकला याच्यावर उपचार घेत असल्याचे दिसून आले.
सदर ड्रायव्हरला प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याचा स्वॅब तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे कोरोना पॉझिटिव्ह क्लिनर संपर्कात अनेक दिवस राहिलेला ड्रायव्हर हा संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या राहत्या घराजवळील परिसर सील करण्यात आला आहे, तर ड्रायव्हरच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Comments