नान्नज,मार्डी,बार्शी,मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा | नव्याने 37 जण पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू , १८ जण कोरोनामुक्त

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शुक्रवारी ग्रामीण भागातील 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये 28 पुरुष तर 9 महिलांचा समावेश होतो.तर 18 जण बरे झाले आहेत.यात पुरुष 15 तर 3 महिलांचा समावेश होतो. आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.


आज उत्तर सोलापुरातील नान्नज येथील एक पुरुष, एक महिला ,मार्डी येथील पाच पुरुष, एक महिला, तिर्‍हे येथील एक पुरुष, एक महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माळशिरस शिंदेवाडी परिसरातील एक पुरुष ,मोहोळ तालुक्यातील साठे नगर मधील एक पुरुष, कोरवली एक महिला ,देवडी एक पुरुष ,बार्शी येथील भवानी पेठेत एक पुरुष ,सुभाष नगर एक पुरुष ,सासुरे एक पुरुष, वैराग येथे 1पुरुष, मंगळवेढा येथील गुंगे गल्ली एक पुरुष, पंढरपूर जुनी पेठ एक पुरुष, इसबावी येथील बसवेश्वर नगर भागातील दोन पुरुष, संत पेठ एक पुरुष, जिजाऊ नगर एक महिला ,यमाई तुकाई मंदिर जवळ 1 पुरुष अक्कलकोट येथील स्वामी विवेकानंद पार्क एक महिला, बुधवार पेठ एक पुरुष ,भारत गल्ली तीन पुरुष एक महिला, मैंदर्गी रोड एक पुरुष ,करजगी दोन पुरुष भोसगा एक पुरुष दोन महिला बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.





Comments