सोलापूर शहरात दहा दिवस संचारबंदी करा; मनपा आयुक्त
सोलापूर (९ जुलै) - आज शहरात मास्क न घालणे, हॅन्डग्लोज न वापरणे, रस्त्यावर थुकणे, कचरा टाकणे आदी बाबतीत २३१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करुन ३१,८५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.
सोलापूर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी किराणा दुकानदार, चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते, सार्वजनिक ठिकाणी जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही आणि ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी मास्क व ग्लोज घालणे बाबत आदेश पारीत केले आहेत. जे व्यापारी आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
त्यानुसार ज्या विक्रेत्यांनी मास्क लावले नाहीत तसेच जे व्यक्ती मास्क तसेच सोशल डिस्टनसीचा पालन करत नाही, अशा ठिकाणी वेगवेगळ्या विभागीय कार्यालयातील आरोग्य निरिक्षकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करणेबाबत आदेश आदेश देण्यात आल्याची माहितीही पालिका प्रशासनाने दिली आहे.
सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी शुक्रवारी सकाळी सातरस्ता येथे शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांना पोलिसांनी फरपटत नेल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. आनंद चंदनशिवे यांनीही अधिकारी वरिष्ठांचे गैरसमजूत करून देतात अशी कैफियत मांडली. त्यावर पालकमंत्री भरणे यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने कठोरपणे उपाययोजना केल्या पाहिजेत.
चाचण्या व्यवस्थित करून संबंधित लोकांना वेळेत क्वारंनटाईन करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. संचारबंदी लागू केली म्हणून लगेच कोरोना संपणार नाही. संचारबंदी काळात गरीब लोकांना धान्य मिळावे अशी प्रशासनाने व्यवस्था करावी अशी सूचना केली. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी व संसर्ग कमी करण्यासाठी शहरात दहा दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी केली. पोलीस आयुक्त शिंदे यांनी संचारबंदी लागू झाल्यावर लोकांनी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

Comments