उपळाई बुद्रुक गाव झाले ‘कोरोनामुक्त’

 कोरोना विषाणूचा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चालला असून माढा तालुका त्यापासून वंचित राहिलेला नाही. माढा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. यातुनच माढा तालुक्यातील अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेले उपळाई बुद्रुक येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते


‘त्या’ व्यक्तीच्या  कुटुंबातील 24 जणांचे अहवाल कोरोना पाॅजिटिव्ह आल्याने उपळाई बुद्रुकची चिंता वाढली . बघता बघता उपळाई गावची रूग्ण संख्या 31 झाली परंतु, अवघ्या 15 दिवसात प्रशासनाला कोरोनावर मात करण्यात यश आले .

उपळाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. धनराज कदम ,उपळाई ग्रामपंचायतचे सरपंच संजय नागटिळक , माढा महसूल विभाग , माढा पोलीस स्टेशन संयुक्त विद्यमाने राबवलेल्या उपाय योजनेला उपळाई गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे व घेतलेल्या खबरदारी मुळे उपळाई बुद्रुक हे गाव सध्यातरी कोरोनामुक्त झाले आहे . यामुळे उपळाई बुद्रुकच्या नागरिकांमधील भिती संपुष्टात येऊन प्रशासनाने केलेल्या उपाय योजने बद्दल व प्राथमिक आरोग्य केंद्र उपळाई यांच्या सर्व स्टाफ चे व वैद्यकीय अधिकारी डॉ.धनराज कदम यांचे आभार मानले जात आहे.

Comments