सोलापूर ग्रामीणच्या 2618 चाचण्यांमध्ये आढळले 126 कोरोना बाधित
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 2 हजार 618 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 492 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 114 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 32 हजार 528 झाली आहे. आज पर्यंत कोरोनामुळे 972 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 710 ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता 29 हजार 846 झाली आहे आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 42 अहवाल प्रलंबित आहेत.
आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील 49 वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील 65 वर्षिय पुरुष, माढा तालुक्यातील बेंबळे येथील 78 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
Comments