पंढरपुर : सतत 'दारू का पिता' विचारले म्हणून नवऱ्याने घातली पत्नीच्या डोक्यात कुन्हाड.. जगीच मृत्यु , वाचा प्रकरण..

पंढरपूर - दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असते म्हणून पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरात हनुमान टेकडी गोशाळा परिसरात बुधवारी साडे तीनच्या वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय 49, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा,पंढरपूर, जि. सोलापूर) असं आहे..
पोलिसांकडून दिलेलेल्या माहितीनुसार ., आरोपी आणि महिलेचा .पती बाबा लक्ष्मण सावतराव हा सतत दारू पित होता.दारूच्या तो प्रचंड आहारी गेला होता . आपला पती दारूच्या आहारी गेल्यामुळे राधिका त्याला वारंवार दारू न पिण्याचा सल्ला देऊन समजूत काढत होती. यावरून राधिका आणि बाबा सावतराव यांच्यात भांडणे देखील झाली होती.
बुधवारी दुपारी सुद्धा सावतराव दारू पिऊन आला होता. त्यामुळे राधिकाने त्याला हटकले होते. पण, दारू पितो म्हणून सारखे बोलते याचाराग मनात धरून त्याने घरातील लाकडं तोडण्याच्या कुऱ्हाडीने राधिकावर हल्ला केला. मानेवर व डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यात घाव बसल्यामुळे राधिका जागेवरच कोसळली. रक्त प्रवाह जास्त झाल्यामुळे राधिकाने जागीच जीव गेला...

Comments