‘इलेक्ट्रो’ यंदा आपल्या दारात ; 25 ते 31 मार्च दरम्यान होणार प्रदर्शन
सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन्स द्वारा डीलर्स इलेक्ट्रॉनिक्स ,कॉम्प्युटर , टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2021चे प्रदर्शन 25 मार्च ते 31 मार्च या कालावधीत होणार आहे. यंदा हे प्रदर्शन शहरातील विविध भागातील सदस्यांच्या शोरूम मध्ये आयोजित केली असल्याची माहिती अध्यक्ष ईश्वर मालू यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा नटराज आटा चक्की हे मुख्य प्रायोजक असून बजाज फिन्सर्व हे कंजूमर फायनान्स असोसिएट आहेत. चे प्रदर्शनाचे उद्घाटन 25 मार्च बुधवारी सकाळी 11 वाजता देवांग पाठक मॅनेजिंग डायरेक्टर फ्लोरा यांच्या हस्ते झूमद्वारे संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो 2021 प्रदर्शनाचे ही 22 वर्ष असून सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या सर्व ग्राहक प्रदर्शनाची वाट पाहत असतात. दररोज सकाळी दहा ते रात्री 9 पर्यंत चालणार्या या प्रदर्शनामध्ये या कालावधीमध्ये एक नवीन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सहभाग राहणार आहे. ग्राहकांसाठी विविध स्कीम्स, डिस्काउंट, बक्षिसे देण्यात येतील.
प्रदर्शनासाठी सर्व सहभागी सदस्यांना आपल्या शोरूम मध्ये इलेक्ट्रो करिता वेगळे काउंटर ची व्यवस्था करणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टनस आधी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषद सेडाचे सचिव आनंद येमुल, सूर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भूषण भुतडा, माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, खुशाल देढीया, विजेते टेके, सुयोग कालानी , गिरीश मुंदडा हरीश कुकरेजा आदी उपस्थित होते.
हे असणार प्रदर्शनमध्ये…
या प्रदर्शनात एलसीडी, एलईडी, कलर टीव्ही, फ्रिज साईड बाय साईड फ्रीज , एयर कंडीशनर ,म्युझिक सिस्टिम, वॉशिंग मशीन, डिश टीव्ही, मायक्रो ओव्हन व्याक्युम क्लिनर , एअर कंडिशनर, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, मोबाईल, टेलिफोन, सिमेंट, मिक्सर फूड, प्रोसेसर आटा चक्की, एअर कुलर , वॉटर पुरिफायर, किचन चिमणी, कम्प्युटर आदी असणार आहे.
लकी ड्रॉ द्वारे 1. 75 लाख रुपयांचे बक्षीस
यंदाच्या इलेक्ट्रो प्रदर्शन मध्ये खरेदी केलेल्या वस्तूंवर ग्राहकांना लकीड्रॉ द्वारे सुमारे 1. 75 लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या संयोजनासाठी सेडाच्या वतीने करण्यात आले.

Comments