उजनी पाणीसाठा ७० टक्केवर

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रास  झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील धरणे भरलीत. यामुळे उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे उजनी धरण आज ७० टक्के पर्यंत भरले आहे. धरणातील पाणी साठा वाढू लागल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावत आहे.

यंदा राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस सुरु असताना उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजा रुसला की काय म्हणायची वेळ आली होती. 



मागील महिन्यात पावसाने ब्रेक लावल्याने उजनी धरणाचा पाणीसाठा ६० टक्क्यावरच रेंगाळला होता. आता उजनीत दौंड येथून १४७५६ व बंड गार्डन येथून १४४६५ क्युसेक्सचा विसर्ग येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून तो ७० टक्केवर पोहचलाय. गतवर्षी आजच्या दिवशी धरणा १०९ टक्के पाणीसाठा होता.

उजनीवरील पवना, चासकमान, वरसगांव, पानशेत, खडकवासला ही धरणे भरली असून यातून पाणी सोडण्यात आहे. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढत आहे. इकडे वीर धरणातूनही मोठ्याप्रमाणात निरानदीत विसर्ग सुरु झाला आहे.

उजनी ही सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असल्याने धरण 100 टक्के भरल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी निर्धास्त बनत असतो. मात्र यंदा राज्यभर सर्वत्र चांगला पाऊस सुरु असताना उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजा रुसला की काय म्हणायची वेळ आली आहे. 

Comments